Wednesday, September 2, 2015

मरताना रावणाने लक्ष्मणाला काय सांगितले ? 


रावण ज्या वेळी मरणासन्न अवस्थेत होता...
त्या वेळी भगवान श्रीरामाने लक्ष्मणाला सांगितले की, या विश्वाला नीति, राजनीति आणि शक्ति चा महान पंडित सोडून चालला आहे. तु त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून जीवनाबद्दलचे शिक्षण घे, जे तुला या जगात त्यांच्या शिवाय दुसरा कोणी देऊ शकणार नाही.

श्रीरामाची आज्ञा मानून लक्ष्मण मरणासन्न अवस्थेत असलेल्या रावणाच्या डोक्याजवळ जावून ऊभा राहिला...

रावण एक शब्द ही बोलला नाही. लक्ष्मण परत भगवान रामा जवळ आला.

तेव्हा भगवान राम म्हणाले कोणाकडुन ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्याच्या डोक्याजवळ नाही तर त्याच्या पायाजवळ ऊभे रहावे.

तेव्हा भगवान रामाचे म्हणने ऐकून लक्ष्मण यावेळी रावणाच्या पायाजवळ जाऊन ऊभा रहिला.

त्यावेळी महापंडित रावणाने लक्ष्मणाला तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. ज्या आयुष्याची गुरुकिल्ली आहेत...

१. शुभस्‍य शीघ्रम: 
पहिले वचन रावणाने लक्ष्मणाला सांगितले ते म्हणजे "शुभ कार्य" जेवढे लवकर सुरु करता येईल तेवढे लवकर सुरु करावे म्हणजेच शुभस्‍य शीघ्रम. "अशुभ" जेवढे लवकर सोडून देता येईल तेवढे लवकर ते सोडून द्यावे. 
मी श्रीरामला ओळखले  नाही, त्यांना शरण जायेला मी उशीर केला, म्हणून माझे असे हाल होत आहेत. 

२.  शत्रूला कधीच कमजोर समझू नये 
दुसरे वचन असे आहे कि "शत्रूला कधीच कमजोर समझू नये ". मी ज्यांना साधी माकडे समझत होतो त्यांनी माझी सर्व सेना आणि सोन्याची लंका नष्ट केली. मी ब्रह्म देवाकडून जेव्हा वरदान मागितले होते तेव्हा मनुष्य आणि  वानर च्या शिवाय माझा कोणीही वध करू शकनार  नाही  असे मागितले होते, कारण मी मनुष्य आणि  वानर यांना मी तुच्छ समझत होतो. तीच माझी चूक होती. 

३. रहस्य हे रहस्य च राहू दे    
रावणाने लक्ष्मणाला तिसरे आणि शेवटचे वचन असे सांगितले कि आपल्या जीवनात काही रहस्य असतील तर कोणालच सांगू नये. माझ्या मृत्युचे रहस्य विभीषण ला माहित होते. माझ्या बेंबी मध्ये अमृत आहे असे विभीषण ला सांगितले होते कारण तो माझा सर्वात प्रिय भाऊ होता, मी स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता कि विभीषण माझा विश्वासघात करेल. हीच माझी सर्वात मोठी चूक होती. 

No comments:

Post a Comment